"चालता फिरता टॉर्च"



                आज आपण जे अँप पाहणार आहोत, ते वापरण्यासाठी  अगदी सोपे आणि समजण्यासाठी ही तितकेच सोपे आहे.
              
                                   "Flash light"
                हे App आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करायची आहे.

१. आपल्या मोबाईलमधील Play store वर क्लिक करून सर्वांत वर येणा-या Search Option मध्ये " Flash Light" असे टाईप करावे.

२. आपल्याला ह्या App चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला ह्या appची माहिती मिळेल.

३. तिथे Install वर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल मध्ये हे App डाऊनलोड होण्याची सुरूवात होईल.

४. डाऊनलोड पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाईलच्या इतर Iconsमध्ये ह्या
Appचा Icon दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर आपल्या  वापरासाठी हे  app सज्ज होईल.

५. हे App सुरु केल्यावर आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर आपल्या नेहमीच्या बँटरीच्या बटणासारखे एक बटण दिसेल. ते बटण वरच्या बाजूला सरकवल्यावर आपल्या मोबाईलच्या कँमेरातून Flash/LED लाईट सुरु होऊन आपल्याला  Torch म्हणून वापरता येते.

६. ज्या मोबाईलमध्ये LED नसेल, त्या मोबाईलमध्येही हे अँप चालू शकते.फक्त फरक एवढाचं की कँमेराच्या Lens ऐवजी आपल्या मोबाईलची स्क्रिनच आपल्याला हवा तेवढा प्रकाश देते.

   काय वेगळेपण आहे मग ह्या App मध्ये??

१). आज कालच्या बहुतेक मोबाईलमध्ये Flash light चा पर्याय आधीपासूनच(Inbuild) असतो. पण प्रत्येकाला महाग मोबाईल घेणे शक्य असतेच असे नाही. आणि हे अँप असल्यावर मग आपल्याला वेगळा बँटरीचा टॉर्चदेखील सांभाळण्याची गरज नाही. स्मार्ट फोनचा सोपा वापर करुनही आपण ह्या बँटरीचा वापर करु शकतो.

२) Strobe Light-
     ह्या App मध्ये आपल्याला Strobe light हा पर्याय मिळतो. ही
लाईट आपण रेग्युलर म्हणजे विशिष्ट गतीने लाईट फ्लॅश करण्यासाठी वापरू शकतो. ह्या लाईट उत्पन्न करण्याच्या क्रियेला Cylindrical Motion म्हणतात.

मग अशा प्रकारच्या लाईटचा वापर कसा करतात?

अ) बॅटरीमध्ये एनर्जी म्हणजेच चार्ज(charge) सेव्ह करण्यासाठी वापरतात.

ब) तसेच नाईट क्लब किंवा DJ nights मध्ये ही मनोरंजनासाठी ह्या लाईटचा वापर होतो.

३) Morse Code(मॉर्स कोड)
मॉर्स कोड म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने आपला संदेश(message) गुप्तपणे आपल्या विश्वासाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. ह्या कोडसाठी एका विशिष्ट आणि तितक्याच सोप्या गोष्टीची ओळख असणे गरजेचे असते.

हा पर्याय वापरताना आपल्याला इथे आपल्याला हवा तो शब्द किंवा आपल्याला हवा तो संदेश आपण टाईप करुन मग Start वर क्लिक करावे. आपल्याला मग त्या विशिष्ट संदेशाचा रुपांतर माँर्स कोड मध्ये झालेले दिसेल.

ह्या लाईटचा वापर आपण कधी करु शकतो.

अ) युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपला गुप्त संदेश आपल्या देशाच्या सैनिकापर्यंत पोहोचवण्यासाठी.

ब) Air Traffic Control-
   जसे रस्त्यावर ट्राफिक असते तसेच आकाशमार्गातही विमानांचे ही ट्राफिक असते. अशा वेळी विमान कधी उड्डाण करावयाचे आणि कधी जमिनीवर उतरावयाचे ह्यासाठीही आपण ह्या लाईटस् चा वापर करुन विमान चालकाला सुचना पोहोचवू शकतो.

अधिक माहितीसाठी आपण ह्या लिंकची मदत घेऊ शकता...

४) Warning Light:-
ह्या पर्यायाचा वापर आपण कधी संकटसमयी असताना लक्ष वेधून घेण्यासाठी करु शकतॊ.

५) तसेच (optometry) डोळे तपासतानाही कमी प्रकाशाची Flash light असलेले App देखील आपण सहज वापरु शकतो.
कमी तीव्रतेच्या appच्या वापराने डोळ्यांना ईजा होत नाही.

६) अचानक घरात किंवा रस्त्यावर असताना लाईट गेल्यावरही ताबडतोब ह्या app चा वापर करुन आपण सुखरुप राहू शकतो.
आणि हे app आपल्याला मोफत असल्याने आपण हे नक्कीच वापरात आणू शकतो.

       इतरही बरेच Flash lightची apps आहेत. पण त्यातल्या त्यात उत्तम आणि वापरण्यास अगदी सोपे म्हणून ह्या Appची निवड केली.
मग वापरणार ना? आपला 24×7 जवळ असणारा, आपल्या स्वतःचा "चालता फिरता टॉर्च".

प्रणिल टाकळे