असे नाते बहीण-भावाचे
वेगळीच व्याख्या ती,
वेगळेच असते नाते,
सर्व नात्यांच्या शिखरी आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
बहीण लहान असो वा मोठी,
भावासाठी तिचा जीव तुटतो,
रोजच्या भांडणातही सुख आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
मोठ्या बहिणीकडे हट्ट तर,
लहान असेल तर दादागिरी,
त्या आगळेपणातही प्रेम आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
हे नाते रक्ताचेच हवे असे नाही,
कोणातही सहज गुंफले जाते,
आजन्मभर ते टिकवण्यासाठी
असे नाते बहीण-भावाचे...
एकमेकांच्या खोडीत साथ असते,
विनाकारण त्रासाला जोड असते,
एकमेकांशिवाय ह्यात गोडी नाही,
असे नाते बहीण-भावाचे...
एक तरी बहीण नक्की असावी,
जिला मनातले सर्व सांगता यावे,
ज्यांच्यात दोघांची गुपिते दडली असतात,
असे नाते बहीण-भावाचे...
प्रणिल टाकळे
Awsome gift for today😍😍
ReplyDeleteप्रणील खूप सुंदर कविता बहीण भावाच्या नात्यातील मृदुता, खोडकरपणा, आगळेपणा सारे काही मांडले आहेत आपण. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी अगदी छान औचित्य साधून लिहिली आहेत . अगदी खरे आहे मनात दडलेली गुपिते सांगायला बहीण भावाचे नाते असावेच लागते.
ReplyDeleteMarvellous poem Pranilji. In this modern age, changing senario of relations between Brother and Sister, this poem creates a sensitivity and perfect Bond to realise this relationship. Thnx a lot.
ReplyDeleteKhupch sundar
ReplyDelete