" श्रीराम आणि हनुमंत.. मैत्री, प्रेमाचे उदाहरण हे मूर्तिमंत"
चैत्र महिना सुरु झाल्यावर सुरुवातीलाच मराठी मोठा सण साजरा होतो, तो म्हणजे "गुढी पाडवा". ह्याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुरु होते. आपण साधारणतः सप्टेंबरमध्ये जी नवरात्र साजरी करतो त्या नवरात्रीला "अश्विन नवरात्र" म्हणतात आणि त्याची सांगता दसरा म्हणजेच विजयादशमीला होते. तर चैत्र नवरात्रीची सांगता "श्रीराम नवमी " ला होते.
श्रीरामाचे नाव ऐकताच क्षणी आपल्यासमोर उभे ठाकते ते तेजस्वी, सामर्थ्यवान, शांत, पराक्रमी असे रुप. श्रीराम हा महाविष्णूची सातवा अवतार आहे. परमात्मा महाविष्णूने जे काही अवतार घेतले, त्यामागे एकच मुख्य उद्दीष्ट होते की ' अशुभाचा नाश'. श्रीरामाचाही जन्म रावणासारख्या मदोन्मत्त लंकापतीचा वध करण्यासाठीच झाला होता.
कैकयीच्या फक्त एका वचनाच्या पुर्तीसाठी १४ वर्षे वनवासात गेलेल्या श्रीराम, जानकीमाता, लक्ष्मण ह्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातले मोठे संकट म्हणजे रावणाकरवी सीताहरण.
मग ह्या सीताहरणा मुळे तिचा शोध घेण्यासाठी राम-लक्ष्मणाला वानरसमाजाने अपार मदत केली. श्रीरामाच्या ह्या खडतर प्रवासात एक मित्र, बंधू, दास म्हणून सर्वच बाजूंनी सहाय्य करणारा परमशिवाचा अंश असलेला "महाप्राण हनुमंत" एकच.
मग ह्या सीताहरणा मुळे तिचा शोध घेण्यासाठी राम-लक्ष्मणाला वानरसमाजाने अपार मदत केली. श्रीरामाच्या ह्या खडतर प्रवासात एक मित्र, बंधू, दास म्हणून सर्वच बाजूंनी सहाय्य करणारा परमशिवाचा अंश असलेला "महाप्राण हनुमंत" एकच.
हनुमंत म्हणजे मैत्री, श्रीरामांवरील दृढ विश्वास, प्रेम त्याग ह्या सर्वांचे मूर्तिमंत व कटटर उदाहरण आहे. हनुमंताच्या जन्मापासूनच त्याचे ध्येय ठरलेलेच होते, ते म्हणजे श्रीरामांचे सामीप्य, प्रेम, भक्ति मिळवणे. श्रीरामांची आज्ञा हेच सर्व गोष्टींचे सामर्थ्य, बऴ आहे, ह्या विश्वासाने सतत मार्गक्रमण करणारा हनुमंत एकच. निश्चल भक्ती आणि अतोनात प्रेम कसे करावे हे हनुमंत आपल्याला शिकवतो. आपणही हनुमंताप्रमाणे Focused असायला हवे. कारण एकदा आपले ध्येय ठरले की मग त्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातूम मार्ग काढण्याचे सामर्थ्य श्रीराम पुरवितच असतात असा हनुमंतासारखा आपणही विश्वास दृढ करायला हवा.
आपल्या मित्राच्या मदतीसाठी कणभरही न थकता, जराही न कंटाळता हाती घेतलेले काम अचूक पूर्ण करणारा हनुमंत एकच. श्रीरामाच्या आज्ञेवरुन जानकीमातेचा शोध घेण्यासाठी संपूर्ण समुद्र उड्डाण करुन जाताना मैनाक पर्वत हनुमंताला त्याच्या छायेत विश्राम करण्याची विनंती करतो, मात्र हनुमंत म्हणतो....
" हनुमान तेही परसा कर पुनि कीन्ह प्रनाम।
राम काजू कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम॥"
सुंदरकांड, ६
श्रीरामाचे कार्य होईपर्यंत मी आराम करुच शकत नाही. सीतामातेचा शोध घेऊन लवकरात लवकर श्रीरामांना संदेश पोहोचवण्याचे कार्य झाल्यावर मी ऩिश्चिंत होईन. आपल्या Priority ला( श्रीरामाचे कार्य) पुर्णपणे पाळणारा हनुमंत एकच. जानकीमातेचा शोध घेऊनच परत येईन, असे वचन हनुमंताने श्रीरामांना दिलेले होते आणि श्रीरामांचाही हनुमंतावर पुर्ण विश्वास होता.
"मैत्रीचे नाते हे प्रेम आणि विश्वास ह्या दोन्हींवर समानपणे अवलंबून असते. कारण मैत्री ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे प्रेम आणि विश्वास.
लंकेपर्यंत जाऊन येण्याच्या प्रवासात श्रीरामनामाचे कवच परिधान करुनच हनुमंत सर्व कार्य करत होता. आपल्या देवा विरुद्ध एकही शब्द न ऐकून घेणारा हनुमंत रावणासारख्या दुर्जनांलाही श्रीरामाचे गुणसंकीर्तन ऐकवण्यात मागेपुढे बघत नाही. श्रीरामाच्या नामात तल्लीन होताना हनुमंत म्हणतो...
"प्रनतपाल रघुनायक, करुना सिंधू खरारि।
गएँ सरन प्रभू राखिंहै, तव अपराध बिसारि॥
सुंदरकांड, १३१
श्रीराम भक्तांचा प्रतिपाऴ करणाऱे, करुणेचा सागर व शरणागताचे रक्षक आहेत. त्यांना शरण येऊन रावणा तुझा उद्धार करवून घे. श्रीरामांच्या चरणांना हृदयात धारण करुन घेशील तर जगातील सर्व सुखे आपोआप
तुला मिळतील.
श्रीरामांनी हनुमंताने त्याला सोपविलेले कार्य करुन आल्यावर त्यांचे आभार मानून मिठी मारतात की एवढे कार्य करुनही हनुमंता तू दमला नाहीस? अगदी आहेस तसाच आनंदी आणि शांतच आहेस. श्रीरामांनी जसे बंधू हनुमंताला कार्य पार पाडण्यासाठी मारलेल्या मिठीचा सोहळा अपरंपार आहे.
श्रीराम आणि हनुमंत ह्याच्यात अजून एक नाते दिसून येते ते म्हणजे दास्यत्वाचे. हनुमंत हा नेहमीच श्रीरामाचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानत असतो तरीही श्रीराम हनुमंताला आपल्या मित्राबरोबरच पिताही मानत असतात.
श्रीराम व हनुमंताविषयी जेवढं आपण लिहू तेवढं कमीच आहे. पण ह्या श्रीरामनवमीच्या पवित्र दिवशी श्रीराम जन्माच्या आनंदाबरोबरच श्रीराम व हनुमंताच्या अलौकिक मैत्रीचे ही स्मरण करुया.
श्रीराम-हनुमंतासाठी दोन शब्द....
श्रीराम-हनुमंतासाठी दोन शब्द....
हनुमंताशिवाय राम नाही..
रामाशिवाय हनुमंताचे अस्तित्व नाही...१
अलौकिक नाते हे तुमचे,
अपार प्रेम श्रीराम-हनुमंताचे...२
श्रीरामाच्या हृदयी हनुमंताचा वास,
अन् हनुमंताच्या हृदयी श्रीराम निवास...३
प्रणिल टाकळे
link for ramnavmi utsav:- http://ramnavamiutsav.aniruddhabapu.in/



Solid article pranil bhava... Ambadnya
ReplyDelete