पाडगावकर.... एक सुंदर झाड...
शब्द, त्यांची योग्य रचना, शब्दांमध्ये ओतलेला जीव,त्या शब्दांचा अर्थ, आणि मग त्या अर्थपुर्ण शब्दांना मिळणारा साज म्हणजे त्यांना कवितेच्या रुपात नटवणे, ही लक्षणे प्रत्येक कवीमध्ये आपल्याला दिसतात. पण ज्यांनी स्वतःचा संपुर्ण आयुष्य ह्या शब्दांसाठी वेचलं त्या मोजक्याच कवींचे नाव अजरामर झाली. त्यांतीलच एक नाव.... श्री. मंगेश पाडगावकर.
पाडगावकरांचे नाव आठवले की लक्षात येते, ती त्यांची विशेष लेखनपद्धती, स्वतःच्या वयापेक्षाही निराळीच कविता लिहीण्याची शैली आणि कोणत्याही विषयावर सम्रगपणे लिहीण्याची सवय. त्यांनी लिहीलेल्या अनेक कविता, भावगीते, भक्तीगीते, प्रेमगीते, बडबडगीते ऐकताना समोर ती-ती चित्रे नाही उभी राहली, असं होणं शक्यच नाही.
त्यांनी लिहीलेल्या भक्तीगीताचे शब्द मनाला असंख्य वेळा समजावतात, की होय, परमेश्वर आहे आणि तो त्यांच्यावर प्रेम करणा-या प्रत्येकावर अमर्याद प्रेम करतोच.
"भावभोळ्या भक्तीची ही एकतारी,
भावनांचा तू भुकेली रे मुरारी..."
"भाबडी दासी जनी बा गाता गाणी,
दाटूनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी..."
लहानपणी अगदी मला आवडणारे आणि आजही त्या गीताचे बोल आठवल्यावर बालपण आठवायला लावणारे गीत म्हणजे...
"सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय?
पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून,
सुट्टी मिळेल काय?"
हे बडबडगीत गेली अनेक वर्षे प्रत्येकांच्या मनात नक्कीच घर करुन असेल. Johnny johnny...yes pappa ह्यापेक्षाही लहान मुलांनी शाळेच्या स्नेहसंम्मेलनात जास्तीत जास्त टाळ्या मिळवूनदेण्यात "भोलानाथ आजही कसूर सोडत नाही.
"लाजून हासणे अन् हासून हे पहाणे,
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..."
एक प्रियकर आपल्या प्रेयसीवर जीवापाड प्रेम कसा करतो आणि प्रेयसीचे नाजूक, भावपुर्ण प्रेम कसा अनुभवतो आणि त्यावेळी त्या प्रियकराने व्यक्त केलेल्या त्याच्या मनमोकळ्या प्रेमभावना पाडगावकरांनी अगदी जशाच्या तशा वरील गीतामध्ये मांडल्या आहेत... हे गीत ऐकताना प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण पाडगावकर नक्कीच करुन देतात.
एक ना अनेक गीतांना पाडगावकरांनी आपल्यासाठी खुले केले. त्यांच्या कवी मनाने अनुभवलेल्या प्रत्येक अनुभूतीची ओळख सगळ्यांना व्हावी, ह्यासाठी त्यांच्या लेखनाचा अस्वाद घेणे खरचं एका स्वर्गासारखं आहे.
त्यांचे मराठी संस्कृतीसाठी असलेले योगदान हे कधीच काळामागे जाऊच शकत नाही. उलट आजच्या नव्या पिढीला पाडगावकरांच्या एक एक कविता ऐकवल्या, तर त्यातला गोडवा नक्कीच जाणवेल.
काल अचानक बातमी वाचली, श्री. मंगेश पाडगावकर यांचे निधन आणि क्षणभर त्यांच्या काही वाचलेल्या, ऐकलेल्या गीतांची उजळणी मनात सुरु झाली आणि त्यांच्या आठवणींनी मनात कोलाहल माजला. आज शब्द पोरके झाले हे नक्कीच... पण माय चण्डिकेकडे आणि परमात्म्याकडे हेच मागणं आहे की जेव्हा कधी पाडगावकर पुन्हा जन्म घेतील तर त्यांना ह्या आपल्या मराठी संस्कृतीमध्येच घेता येऊ दे.
पाडगावकर नावाचं हे सुंदर झाड कधीही न सुकणार आहे. चिरतरुण आणि सदाबहारच राहणार आहे. मनात त्यांच्या जाण्याची सल नक्कीच राहणार आहे. त्यांनीच लिहीलेली एक कविता इथे लिहून पाडगावकरांना श्रद्धांजली अर्पण करतो.
पाडगावकर नावाचं हे सुंदर झाड कधीही न सुकणार आहे. चिरतरुण आणि सदाबहारच राहणार आहे. मनात त्यांच्या जाण्याची सल नक्कीच राहणार आहे. त्यांनीच लिहीलेली एक कविता इथे लिहून पाडगावकरांना श्रद्धांजली अर्पण करतो.
"धूके दाटलेले उदास उदास,
मला वेढीती हे तुझे सर्व भास..."
"क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास...."
प्रणिल टाकळे


0 comments