१० वा वाढदिवस "प्रत्यक्ष"चा
          
            २००५ ते दत्तजयंती २०१५... "प्रत्यक्ष"... बिगर राजकीय दैनिक ह्या वृत्तपत्राला बघता बघता १० वर्षे पुर्ण झाली. दिवसागणिक "प्रत्यक्ष"चे स्वरुप बदलत गेले. आणि नक्कीच अजून बदलत्या काळाला साजेसे सुंदर स्वरुप "प्रत्यक्ष"ला नक्कीच मिळेल. आजपर्यंतही "प्रत्यक्ष"ने प्रत्येकासाठी भरपूर काही दिलयं. 
   
           माझी स्वतःची एक कवी म्हणून किंवा नवनवीन लिहायला शिकवण्यात "प्रत्यक्ष"चाच वाटा बहुमोलाचा आहे, ह्या मला तिळमात्रही शंका नाही. त्यासाठी "प्रत्यक्ष"चे अनंतपटीने आभार.
   
           दरवर्षीप्रमाणेही या १०व्या वर्षीदेखील "प्रत्यक्ष"ने अनेक वेगळ्या आणि सामान्य माणसाने न अनुभवलेल्या आणि न ऐकलेल्या किंवा न पाहिलेल्या गोष्टी समोर आणल्या. ज्यामुळे नवीन शिकायला मिळून स्वतःच्या तुटपुंज्या ज्ञानात मोठी भर पडली आहे.

        यंदाच्या वर्षाचे Tagline म्हणजे,
     
 " विशेष.... विलक्षण...विक्षिप्त..."

               साधाराण वर्धापनदिन येण्या आधी काही दिवसांपासून "प्रत्यक्ष"मध्ये ह्या वेगळ्याच अंकाविषयीच्या Promotion जाहीराती येत होत्या, ज्यावरुन ह्या वर्धापनदिनाच्या अंकात काय काय खजाना असेल, ह्याची अनिवार ओढ लागली. आणि २४ डिसेंबरला पहिला अंक प्रसिद्ध झाला. अंकातला प्रत्येक अन् प्रत्येक लेख बरचं काही सांगून जात होता. बरचं काही शिकवत होता.

            आपल्या यावर्षीच्या Tagline नुसारच मी त्या लेखांचे वर्गीकरण करेन. 
विक्षिप्त
            रेवती दळी ह्यांचा "ओकिगाहारा.. सूसाईट फॉरेस्ट" हा लेख वाचून क्षणोक्षणी अंगावर काटा येत होता. ते भयाण चित्र डोळ्यांसमोर चित्रित होत होते. मनावर विश्वास बसत नव्हता की खरचं आजही ह्या गोष्टी आहेत आणि त्या घडतात??? विक्षिप्त म्हणजे नेमकं कायं, हे मला ह्या लेखावरुन समजलं. 
"जे चमकतं ते सगळंच सोनं नसतं", ही म्हण ह्या लेखासाठी अगदी साजेशी आहे.  कारण आजूबाजूची वर्णन केलेली निसर्गसृष्टी जरी छान असली तरी त्याच्या आत किती भयानक वातावरण असू शकेल, हे ह्या लेखातून कळून आले.

पुढे मला मनापासून भावलेला लेख म्हणजे...
विज्ञानाची "विलक्षण" प्रगती...
             निखिल भालवणकर ह्यांनी लिहीलेला "क्रांतीकारी .....जी" हा लेख वाचल्यावर विज्ञानाने आजपर्यंत केलेली "विलक्षण" प्रगती आणि अजूनही पुढे नक्कीच घडणारी प्रगती आपल्या लक्षात येते. प्राचीनकाळी एका संदेशवाहकाला संदेेश घेऊन जाण्यापासून ते पत्रव्यवहारपर्यंत, नंतर Landline फोनपासून ते Cordlessपर्यंत, मोबाईल जगताची सुरुवात GPRS ते 2G आणि आता हळू हळू 3G ते 4G आणि त्यानंतर प्रयत्न चालू असलेले 5G. अगणिक झालेली आणि यापुढेही होऊ घातलेली "विलक्षण" प्रगती डोळे दिपवणारी आहे. नवनवीन ....जी पर्यंतचे मार्गक्रमण दर्शवणारा हा "क्रांतीकारी .....जी" लेख.

                 प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे आपल्या आईवर जितके प्रेम असते तेवढे वडीलांवर पण असतेच असते. कारण काळानुरुप आणि योग्य समजूत घालण्यासाठी, काही तरी हट्टाने मागण्यासाठी, आईच्या पडद्यामागून का होईना पण मुलांना पाठींबा देण्यासाठी डॅड(बाबा) असतात. आणि हेच प्रत्येक बाळासाठी नेहमी "विशेष"च असते, हे १०८% खरं आहेच. जितेंद्र रांगणकर ह्यांचा "आय लव्ह यू माय डॅड" हा प्रत्येकाला साहजिकच आवडणारा लेख मलाही आवडला. ह्या लेखातून लेखकाचे अनुभव वाचताना कधी कधी आपल्याही नकळत हे अनुभव येऊन गेले आहेत, ह्याची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. 
हा तो लेख जो माझ्यासाठी "विशेष" आहे, कारण "ते"(डॅड) मला हवेहवेसे वाटणारे आहेत. त्याच्यामुळे सारं जग पाहायला मला मिळतं आहे, ह्यातच मी धन्य आहे.

"विशेष.... विलक्षण...विक्षिप्त..." ह्या नावानुसार मला बरचं काही देणा-या माझ्या "प्रत्यक्ष" मित्राला १०व्या वर्धापनदिनाच्या 'प्र-निलयम्' तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा...

प्रणिल टाकळे