रोजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे किंवा कार्डस् विसरता का?? मग आता काऴजी करण्याची गरज नाही.. बना स्मार्ट आणि वापरा "घरचा Scanner".

Just Click A Photos And Simply Make Your Own Document Ready.

रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण कधी कधी महत्त्वाच्या गोष्टी घ्यायला विसरतो. त्यात काही ऑफिस किंवा कॉलेजमध्ये हव्या असतात तर काही रेफरन्स(Rerfence) म्हणून आपले पॅनकार्ड, आधारकार्ड हवे असतात. आपण एखादे वेऴी समोरच्याची समजूत काढून अगदी Original कार्ड किंवा कागदपत्रे नाही देऊ शकलो तरी झेरॉक्स चालू शकतात. त्यासाठी लागणारे मुख्य कागदपत्रे आपल्याकडे नसतात आणि घरचे अंतर जास्त असल्यावर ते आणणे ही तितके सोपे नसते मग अशावेळी आपण एक ऍप वापरु शकतो.

कॅमस्कॅनर [Camscanner- Photo PDF creator]

हे एक असे ऍप आहे की जे सर्वांना वापरता येऊ शकते म्हणजे कॉलेजला जाणारे ते ऑफिस मध्ये काम करणा-यापर्यत आणि मुख्य म्हणजे ज्यांना ज्यांना मोबाईल वापरता येतो ते सगऴे ह्या अँपचा वापर करु शकतात. अगदी आजी- आजोबा देखील.

"Android" मोबाईल सिस्टिम(हल्ली प्रत्येक मोबाईलमध्ये असते) असणा-या सर्व मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन सहज वापरता येते.

चला तर मग आता ह्या ऍपचा वापर आपल्याला कसा करता येईल हे क्रमाने पाहूया.

१) आपल्या मोबाईलच्या Menu मध्ये  Play store नावाचा Icon असतो, त्यावर क्लिक करुन सर्वात वर येणा-या  Search Option मध्ये आपण CamScanner- Photo PDF Creator असे टाईप करुन  हे ऍप डाऊनलोड करुन घ्या.

२) Install केल्यावर आपल्या मोबाईच्या Menu मध्ये ह्या डाऊनलोडेड(Downloaded) ऍपचा Icon तयार होईल.

३) मग  त्या ऍपला ओपन केल्यावर तिथे खालच्या बाजूला मधोमध कॅमेराचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईलचा रेग्युलर कॅमेरा चालू होतो.

४) मग आपल्याला हव्या त्या कागदपत्राचा किंवा कार्डचा फोटो व्यवस्थित काढा.

५) तो फोटो काढून झाल्यावर मग तिथे आपल्याला [√] बरोबर आणि [×]चूक असे दोन पर्याय येतील. आपल्याला हवा तसा फोटो आला असेल तर [√] वर क्लिक करावे अथवा [×] वर क्लिक करुन पुन्हा फोटो काढून घ्या.

६) इथे फोटो Cropping चाही पर्यार उपलब्ध आहे. तो वापरुन नेमका हवा असलेला भाग निवडून घ्या.

७) मग रंगीत किंवा Black & White हवा तसा रंग आपण निवडून पुन्हा [√] वर क्लिक करा.

८) असे एका मागे एक फोटो काढून वरीलप्रमाणे पद्धत वापरावी. इथे आपल्याला प्रत्येकवेळी पानक्रमांक देण्याची गरज भासत नाही कारण ते आपोआपच सेव्ह होत जातात.(ह्याला Auto Generation म्हणतात)

९) सर्वात शेवटी खाला PDF बटन वर क्लिक केल्यावर आपण तयार केलेले काम सेव्ह होते.

१०) ही PDF आपण Bluetooth ने शेअर करु शकतो किंवा Pendrive मध्ये घेऊन त्याची रितसर printout ही काढू शकतो.

ह्या CamScannerला आपण घरचा Scanner ही म्हणू शकतो. प्रत्येकाला स्वतःचा असा scanner घेणे शक्य नसते किंबहुना ते परवडणारे नसते. मग आपल्या मोबाईललाच आपण उत्तमरित्या Scanner बनवू शकतो आणि मग वेगळ्या scanner ची गरज भासणार नाही.

आहे की नाही एक वेगळी, लहान वाटणारी पण खूप उपयोगी अशी गंमत....!
आता फक्त गरज आहे ती स्मार्ट बनून आपल्या स्मार्ट फोनचा स्मार्टली वापर करण्याची..
- प्रणिल टाकळे