माझं बापूंकडे येणं हे मी ठरवलचं नाही. जणू "त्याला"च वाटलं की ह्याची वेळ आली आहे आणि आता ह्याला आपल्या साथीची खूप गरज भासणार आहे. आणि मी माझ्याही नकळत कधी बापूंचा झालो हे मलाही कळालं नाही. तसे माझ्या आईची आई ही अशिक्षित असूनही देवीभक्त आहे आणि म्हणून आपसूकच तिच्यामुळे माझी आई आस्तिक आहे. असं म्हणतात आजारपण हे अनुवंशिकतेने येतात पण मला लागलेला भक्तिचा लळा हा माझ्या आजी व आईकडून आलेली अनुवंशिकता म्हणायला नक्कीच हरकत नाही.
मी जवळजवळ ३ महिन्यांचा असल्यापासून आम्ही प्रत्येक दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत शिरडीला जायचो. बाकी मित्र त्यांच्या त्यांच्या गावाला जायचे आणि आम्ही शिरडीला. तेव्हा लहान वय असल्यामुळे कधी कधी वाटायचं की काय सारखं सारखं फक्त शिरडीला जायचं? पण आज मनाला सुखावतं की खरचं तेव्हा दिलेलं बाळकडू खरचं उपयोगी होत. जसं फक्त जन्माच्या वेळी आपण काही लसीकरण करुन घेतो तशीच त्यावेळी घेतलेली भक्तीची लस आयुष्यभर तारणारी असते.
नंतर ६वी मध्ये असताना माझं एक minor operation झालं होतं, म्हणून काही दिवस शाळेला जायला जमणार नव्हतं. मग त्यावेळी मला घरात बसून कंटाळा येवू नये म्हणून माझ्या मावशीने मला श्रीअनिरुद्ध उपासना आणि वार्षिक अनिरुद्ध विशेषांक आणून दिला. मग कुतुहलाने विशेषांक वाचायला सुरुवात केली आणि त्याची गोडी लागू लागली. आईपण तेव्हा अनिरुद्ध पाठचे पुस्तक वाचायची. काही दिवसांनी उपासनेला जाण्याचा योग आला. व नंतर २००३ ची रामनवमी होती. न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा. दर्शनाची पहिलीच वेळ होती म्हणून excitement होती(आजही तेवढीच आतुरता असतेच). पहिली बापूंशी झालेली नजरभेट ही कायमची मनात घर करुन आहे. आजही एवढ्या वर्षानंतर बापूंमुळे स्वतः मध्ये झालेले सकारात्म बदल पाहून मनाला हायसं वाटत.
तरूण मुलं काय देवळात जातात? काय भक्ति करतात? Its too downmarket or low cast. असं काही जराही नसून आज अभिमान वाटतो की मी माझ्या बापूंचा वानरसैनिक आहे. इतर कोणी काहीही बोलो पण मला माहित आहे माझं खरं हित फक्त बापूंबरोबर आहे.
आज बापूंनी माझ्यातले अनेक चांगल्या गोष्टींना उजाळा दिला आहे. संस्कारभारती रांगोळी, कविता लिहिणे वगैरे. शिरडीत अनेक वर्ष जाऊन पण साईसच्चरित माहीत नव्हते, तेही साईसच्चरिताच्या पंचशील परीक्षा बापूंकडे देतात नव्याने शिरडी आणि साईंची ओळख झाली.
अनिरुद्धाच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मुळे सक्षम व सुजाण नागरिक बनून आपत्तीप्रसंगी स्वतः बरोबर इतरांनाही कसे वाचवता येईल, ह्याचे प्रशिक्षण घेता आले.
0 comments