रांगोळी... म्हणजे माझा आवडता छंद. सुरुवातीला दिवाळीला आई रांगोळी काढायची आणि मी तिच्या बाजूला बसून ती काय करते? रांगोळी कशी काढते? रंग कसे भरते ते बघत बसायचो. एके दिवशी आईला यायला उशीर होणार म्हणून प्रयत्न करावा असं मनात आलं आणि रांगोळी काढायला घेतली. सुरुवातीला ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये मन रमू लागले पण नंतर हळूहळू सर्वांच मन आकर्षून घेणा-या संस्कारभारती रांगोळीकडे माझा कल वाढत गेला आणि घरातल्या प्रत्येकाचा आधार मिऴत गेला. आजही जी मी मोठमोठी रांगोळी काढू शकतो त्याचे सर्व श्रेय मी माझ्या कुटुंबीयांना देईन.