बेसिक रिसपेक्ट - Basic Respect


              काल असाच रिकामा वेळ होता तर म्हटलं की टिव्ही पहावा. तर एका वाहिनीवरच्या मालिकेतला एक वाक्य खूप आवडलं, जे असं होतं... 
"
प्रत्येक व्यक्तीने नेहमी “Basic Respect”  दिला पाहिजे मग तो Basic  Respect त्याने स्वतःसाठी मिळवला पाहिजे."
         आता ह्यातला  Basic Respect  म्हणजे नक्की काय असू शकता? हे आपण  बघूया.

              Respect चा मराठीतला अर्थ म्हणजे आदर. आपण नेहमी लहानपणापासून शिकतो की मोठ्यांचा(वडिलधा-यांचा) आदर करावा. त्यांनी सांगितलेले ऐकावे. पण मग आपण असाही विचार करु शकतो की आपण ज्यांचं ऐकतो ते आपलं ऐकण्यापेक्षा अगदी कधीतरी आपल्या अपेक्षेनुसार वागतात का
आदर देणे म्हणजे एखाद्याचा मान ठेवणे असा होतो. पण Basic Respect म्हणजे प्रत्येकासाठीचा एका पातळीवरचा केलेला आदर. मग हा Basic Respect फक्त लहानांनीच मोठयांचा करायचा असतो का? 
उत्तर आहे... नाही. कारण Basic Respect हा प्रत्येकासाठी असायला हवा आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाने तो पाळणे आवश्यक आहे. लहानांना मोठयांच्या बाबतीत आणि मोठयांनीही लहानांच्या बाबतीत.
अगदी प्रत्येकजण ह्या Basic Respect चा हक्कदार असतो. लहान बाऴापासून ते वयस्कर आजी- आजोबांपर्यंत. एका गृहिणीपासून ते मोठया कंपनीत काम करणा-या व्यक्तींपर्यंत. शाळेतल्या शिक्षकांपासून ते विद्यार्थी इतकचं नव्हे तर शिपाई आणि वॉचमनपर्यंत सगळ्यांना हा Basic Respect आपण दिला पाहिजे.

        कामावरून किंवा वयावरुन आपण एखाद्याची क्षमता किंवा चिकित्सकपणा कधीच ठरवू शकत नाही. आज एक ६० वर्षाची व्यक्ती दिवस भरात घर आणि ऑफिस लीलया सांभाळू शकतात तर एक २० वर्षाचा मुलगा/मुलगी तेवढं करु शकतील का? नक्कीच मनात प्रश्न येतोच. त्यामुळे आपल्यापेक्षा हुद्दयांने कमी पातळीवर असलेल्या व्यक्तीला त्याचा Basic Respect देता आला पाहिजे. जास्त काही करायचं नसतं फक्त प्रेमाने विचारपुस करावी. त्यांनाही कधी आपल्या डब्यातला खायला दिलं तर आभाळ नक्कीच कोसळणारं नसतं. हा त्या त्या व्यक्तीला त्याचा  Basic Respect दिल्या वर त्या व्यक्तिच्याही चेह-यावरचा आनंद बरचं काही देऊन जातो. हे झालं व्यवहारीक जगातलं.पण आपल्या कुटुंबातही प्रत्येकाला हा Basic Respect दिलाच पाहिजे. आज आपल्या यशस्वी होण्यामागे पुर्णपणे बळकट आधार हा आपल्या कुटुंबाचा असतोच. कुटुंबातला प्रत्येक जण प्रत्येकासाठी झटतचं असतो. मनात कधी कधी रागही असतो पण तोही अगदी लटका. पण त्या रागामुळे आपण आपल्या कुटुंबातल्या कोणालाही मुद्दामुन हानी पोहोचवण्याचा साधा विचारही करत नाही. 
  
       लहान मुले जस आपल्यापेक्षा मोठे असलेल्यांचा आदर करतात तसेच मोठयांनीही लहानांची काळजी, आपुलकीने केलेली विचारपुस, प्रेम करायलाच हवे.लहान मुलांची आशा असते की त्यांनाही कोणीतरी वेळ द्यावा. आताच्या काळात ऑफिसला गेलेल्यांची मुले पाळणाघरांत असतात. तेव्हा मोठयांचे बरेचदा म्हणणे असते की मी आता ऑफिसमधून आलो आहे , आता मला काही सांगू नका. मग कधी कधी लगेच चिडतात. अशा वागण्याने लहान मुलांच्या मनावर तेच विचार घोळत राहतात आणि मग कधी कधी त्यांच्या मनासारखं लहानसं तरी नाही झालं तरी लहान मुलं रागावतात, चिडतात, उलटून बोलतात. आणि मग मोठयांना तसे लहान वागले तर ते सहजासहजी आवडत नाही. पण ह्याची सुरुवात आपणच कुठून ना कुठून करत असतो, हे आधी लक्षात घेऊन अगदी प्रत्येकाचा, लहान मुलाचा त्यांचा Basic Respect दिला पाहिजे. त्यामुळे कुटुंबातही सख्य राखले जाऊ शकते आणि रोजच्या संपर्कातल्यांबरोबरही. जास्त काहीच नको असते, हवे असते ते प्रेम, आधार आणि Basic Respect...


Whenever we want to earn "Basic Respect", first we have to learn how to give "Basic Respect" to all..

प्रणिल टाकळे