जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठीचा मोठा, मनाचा असा हा दिवस. आपल्यासाठी प्रत्येक दिवशी जगणा-या, झटणा-या आईसाठी, पत्नीसाठी, बहिणीसाठी रोजच खरा तर महिला दिन साजरा करायला हवा. कुटुंबाबरोबर संपूर्ण देशही एकटी स्त्री चालवू शकते, हे इंदीरा गांधींना पाहून आपण समजू शकतो. सावित्रीबाईंसारख्यांनी मुलींच्या शिक्षणाला पुढे आणण्याची चळवळ पाहिली आहे.
"मुलगी शिकली, प्रगती झाली.."
प्रगती नक्कीच झाली, पण आजही आपल्या देशात स्त्रीला तिचा हवा तेवढा मान दिला जातोय का? तिच्या सर्व गरजा, तिचे संरक्षण आज व्यवस्थित होत आहे का? स्वतःच्या कामासाठी स्त्रीचे होणारे शोषण थांबले पाहिजे. आणि आताच्या जगात तर स्त्रीने अबला राहून कसं चालेल? अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली आहे. राणी लक्ष्मीबाईंसारखे कणखर बनता आले पाहिजे.
"एका यशस्वी पुरुषाच्या मागे 'स्त्री' ही असतेच."
एक आई, पत्नी, बहिण, मुलगी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडतचं असते. पण २४×७ प्रत्येक स्त्रिला आपल्या घरच्यांना घेऊन फिरणे शक्य नसते. मग कधी मुंबईमधील Corporate कंपनीमध्ये काम करणा-या स्त्रियांना उशीरापर्यंत काम करत थांबावे लागते. ट्रेनचा प्रवास करावा लागतो तर कधी ऑफिसच्या कॅबने घरी यावे लागते. तेव्हा ९९% स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागते. तरी ती कशी? हे आपण m-indicator ह्या अँपद्वारे बघूया.
मुंबईत राहणारे जवळ जवळ सगळेजण "m-indicator" नावाचे अँप वापरतात. बहुतांशी लोकांना फक्त ट्रेनचे वेळापत्रक पाहण्यासाठी आणि हल्ली BEST बसच्या मार्गसाठी ह्याचा वापर करताना पाहिले आहे. मी काही स्त्रियांना विचारल्यावर असे लक्षात आले की रोजच्या रोज हाताळणा-या ह्या अँपमध्ये "Women safety" चाही पर्याय आहे, हे माहित नाही. तर मग ह्या सोप्या अँपचा वापर कसा करता येईल, हे पाहूया.
१) m- indicator हे अँप जर आपल्या मोबाईलमध्ये नसल्यास ते Play store मधून डाऊनलोड करून घ्या.
२) नंतर त्या Icon वर क्लिक केल्यावर आपल्याला सर्वात खाली एक लाल रंगाचे Help नावाचे बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर "women Safety" ची विन्डो ओपन होते.
३) त्यात western Railways आणि Central Railway चा helpline नंबर आहे. ज्याच्या वापराने आपण संकटकाळी जिथे असू ते Location जवळच्या Control room ला जाणार असून नजीकच्या कार्यालयातुन तत्काळ मदत मिळू शकते.
४) त्याखाली "Safety Settings" मध्ये आपण आपली माहिती भराव्या.
५) नंतर त्यात दोन Contact number द्यायचे आहेत. ज्याचा वापर करून आपण त्या व्यक्तींना SMS करु शकतो.
आपण एका नंबरसाठी आपल्या वडिलांचा, भावाचा किंवा पतिचा नंबर द्यावा. आणि दुस-या नंबरसाठी ऑफिसमध्ये असताना उशीरा काम करताना एका विश्वासू कर्मचारीचा नंबर सेव्ह करावा.
आपण एका नंबरसाठी आपल्या वडिलांचा, भावाचा किंवा पतिचा नंबर द्यावा. आणि दुस-या नंबरसाठी ऑफिसमध्ये असताना उशीरा काम करताना एका विश्वासू कर्मचारीचा नंबर सेव्ह करावा.
६) ह्या अँपचा आपण आपल्या मोबाईलच्या स्र्किनवर Shortcut Icon ही Create करु शकतो. जेणेकरुन सगळ्या steps संकटकाऴी करण्याची गरज भासणार नाही.
७) ह्या अँपचे प्रमुख २ फायदे आहेत-
a) आपण स्वतः SMS करुन Location पाठवू शकतो.
a) आपण स्वतः SMS करुन Location पाठवू शकतो.
b) किंवा लागोपाठ ३ मिस कॉलस् दिल्यावर Location देऊ शकतो.
टीप - ह्या SMS चा विशेष वापर उपयोग आपण रात्री ९ ते सकाळी ८ पर्यंत करु शकतो. SMS केल्यावर त्याचे जे काही चार्जेस आहेत ते लागू पडतील.
SMS च्या चार्जच्या चिंतेपेक्षा आपला जीव वाचवणे आणि त्याहीपेक्षा प्रत्येकवेळी सतर्क राहणे जास्त महत्त्वाचे आहे.
रोजच्या वापरातले हे अँप m-indicator आपण असेही वापरु शकतो, हे ज्यांना माहित नाही, त्या प्रत्येक स्त्रीने महिला दिनाच्या शुभदिवसापासून सुरुवात करा. भीती सोडून स्मार्ट बना आणि त्याहीपेक्षा कणखर आणि सक्षम व्हा.
रोजच्या वापरातले हे अँप m-indicator आपण असेही वापरु शकतो, हे ज्यांना माहित नाही, त्या प्रत्येक स्त्रीने महिला दिनाच्या शुभदिवसापासून सुरुवात करा. भीती सोडून स्मार्ट बना आणि त्याहीपेक्षा कणखर आणि सक्षम व्हा.
शेवटी माय चण्डिकेला एकच प्रार्थना.....तुझे कृपाछत्र माझ्या सर्व आईं बहिणींवर सदैव असू दे.
"बाईचं गं कसं जीणं,
चारही बाजू येई क्षीण,
द्यावया आराम,
नाही कोणी तुजविण...."
चारही बाजू येई क्षीण,
द्यावया आराम,
नाही कोणी तुजविण...."
सर्व स्त्रियांना प्र-निलयम तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा! !!
Really Helpful info
ReplyDeleteEven I was not aware about this
Thank you so much
and Thanks for your wishes as well