अपेक्षा
मनात नेहमीच असतात अपेक्षा,
पण दुर्दैवाने होऊ नये उपेक्षा,
त्यासाठी काळजी घ्यावी कुणीतरी,
कुणीतरी कशाला करावी आपल्यांनीच...१
काही अपेक्षित कधी मोठे नसते,
ह्वे प्रेम तेही जरासे असते,
त्याच्या बदल्यात मिळते निराशा,
तेव्हा सगळी ऒढच सरते...२
मग आता....
कराव्यात की नको ह्या अपेक्षा,
कोमेजतात मनाच्या सर्व कक्षा,
अपेक्षेच्या परीक्षेत झुरण्यापेक्षा,
काय असते मोठी स्वतःला शिक्षा...३
प्रणिल टाकळे
0 comments