मोबाईलमागचे जग..... भाग १
आपण जवळजवळ प्रत्येकजण मोबाईल(भ्रमणध्वनी) वापरतॊ. आधी जेव्हा मोबाईलचा शोध लागला तेव्हापासून ते आतापर्यंतच्या काळात मोबाईलचे मुख्य कार्य म्हणजे "संदेशवहन" होय.
अगदी क्षणार्धात आपण एका दूरवर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतॊ. मोबाईल काँलस् हे ह्याचे सोपे उदाहरण आहे. हल्लीचे बहुतांशी मोबाईल "स्मार्ट फ़ोन" म्ह्णून ऒळखले जातात. अगदी कमीत कमी १००० रुपयांपासून ते ३५०००-४०००० रुपयांच्या प्रत्येक मोबाईलचे मुख्य कार्य हे एकच. ते म्हणजे "संदेशवहन" . बाकी Apps हे ज्या त्या मोबाईलच्या दर्ज्यावर अवलंबून असतात.
"Making calls to others & Receive calls from others !"
सुरुवातीला फ़क्त घरीच टेलिफ़ोन असायचे(आजही काहीजण वापरतात.) जे आपल्याला सहज कुठे घेऊन जाणे शक्य नसतात. पुढे मोबाईलचा शोध लागला आणि मग मॊबाईल आपण कसाही आणि कुठेही वापरु शकतॊ. मोबाईलला "भ्रमणध्वनी" किंवा "बिनतारी यंत्र" (Wireless Device) असेही म्हणतात.
पण आपण फ़क्त मोबाईल रोजच्या रोज वापरतॊ, मात्र हे यंत्र वापरताना त्यामागेही काही लहान-लहान परंतु आपल्याला माहिती असाव्यात, अशा गोष्टींचा समावेश येतो, त्याचा आपण आढावा घेऊ.
- नेटवर्क(Network)-
नेटवर्कचा सोपा अर्थ म्हणजे एकमेकांशी जोडले जाणे. दोन भिन्न स्थानांवरच्या व्यक्तींचा संपर्क मोबाईलद्वारे नेटवर्कच्या सहाय्याने होतो. याचाच अर्थ नेटवर्क हे एक प्रकारचे माध्यम आहे जे संपर्क करताना उपयोगास येते. आपण बरेचदा म्हणतॊ की नेटवर्क प्राँब्लेम असल्याने आवाज मिळत नाही. किंवा कधी आपल्या बोलण्यात अडथळे(Disturbance) येतात, तर कधी आपल्याला आपलाच आवाज ऎकायला येतो. हे सर्व व्यवस्थित नसलेल्या नेटवर्कमुळे होत असते. प्रत्येकवेळी नेटवर्क कमी-जास्त (Network Flacution) होते. कारण आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अडथळा ह्यावेळी नेटवर्कमध्ये येत असतॊ.
- मोबाईलच्या युगातले काही फ़ंडे आहेत, जे आपण इथे पाहूया.
१) User Mobility(युजर मोबिलिटी):-
User Mobility म्ह्णजे वापरकर्त्याची हालचाल. उपभोक्ता जो दुरसंचारासाठी( Telecommunication) ज्या सुविधा वापरतॊ, तेव्हा त्याचा वापर करित असताना व्यक्तिला एकाच जागी राहण्याचे बंधन नसते. मोबाईलचा वापर अगदी कुठेही करु शकतॊ.
उदा. रस्त्यावर चालताना, ट्रेनमधून प्रवास करताना इ.
२) Device Portability(डिव्हाइस पोर्टबिलिटी):-
Device Portability म्हणजे वापरण्यास सोयिस्कर असा. मोबाईल हाताळण्यासाठी अगदी हलका आणि सोपा असतॊ.
एकंदरीत काय तर, ज्या यंत्राला वापरण्यासाठी कोणतेही बंधन(वायरचे) नसून ते वापरताना कुठेही आपण वावरु शकतॊ, अशा यंत्राला मोबाईल असे म्हणतात. सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान म्हणजे,
"GSM- GLOBAL SYSTEM FOR MOBILE COMMUNICATION."
पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मोबाईलच्या Antennas कशा कार्य करतात.
प्रणिल टाकळे
क्रमशः
Pranil thanks for explanation of Mobile Terminology in easy manner. eagerly waiting for next article to get information about functioning of Mobile antennas.
ReplyDelete