पायपीट

सुरुवात झाली एका दिशेने,
ठरवले होते एक ध्येय,
कळलेच नाही मग काही,
अचानक सर्व झाले असहाय्य...१

नवीन होतो त्या मार्गात,
म्हणून माहित काहीच नव्हते,
त्यात कडक उन्हांची दुपार,
ऊन सोसता सोसवत नव्हते...२

गंतव्य जरी बरोबर होते,
तरी चुकलेली होती दिशा,
हे लक्षात आले जेव्हा,
तेव्हा ऒथंबून आली निराशा...३

पायपीट ही व्यर्थ झाली,
मेहनत ही वाया गेली,
तरी डोळे लागले नव्या दिशेकडे,
नव्या भविष्याच्या नव्या वाटचालीकडे...४

                                                                                प्रणिल टाकळे