पहिल्या पाऊसाच्या शुभेच्छा खास...
घन पावसाचे ओथंबले,
आधीच बरसण्या आसूसलेले,
अखेर बांध सुटला त्याचाही,
थेंब थेंब शिवार गहिवरले...१
मंद मंद वारा झुळझुळला,
सुगंध ओल्या मातीचा दरवऴला,
क्षणार्धात मग कायापालट झाला,
हळूवार अंगणात पाऊस आला....२
धारा नुसत्या ना त्या आनंदधारा,
सोबतीला वाहणारा गार वारा,
रखरखलेल्या कोवळया मनाला,
ओलेचिंब करुन तजेला देणारा....३
नभ दाटलेले बरसले आज,
अंगणी चढला ओला साज,
पर्जन्याने दिली आस नवी आस,
"प्र-निलयम्"तर्फे पहिल्या पाऊसाच्या शुभेच्छा खास....४
प्रणिल टाकळे
प्रणील खूपच सुंदर कविता. अगदी पहिल्या पावसात मस्तपणे भिजवून तन - मनाला आल्हाद देणारी .
ReplyDelete