अगा पांडुरंगराया.....


अगा पांडुरंगराया,
धाव घेतो तव चरणांसी,
आस लागली तव भेटीची,
नयनी रांग ती आसवांची...१


अगा रखुमाईवरा,
उभा कैसा तू वाळवंटी,
जवळी घे पुनःपुन्हा,
आलिंगनासाठी करितो अटाटी...२


नाम तुझे पांडुरंग जरी,
सावळाचं शोभे तू राऊळी,
दर्शनमात्रे सर्व सुखे,
घालिसी तू मम पदरी...३


अगा माझिया विठुराया,
न होणे पुंडलिक पुन्हा,
  न कदापि होणे एकनाथ,
तरी कधीही साद घालिताच तुला,
अवचित करिसी पुढे मदतीचा हात...४


कृपाकर जैसे तुझे,
सदा विराजमान कटीवर,
नयनांतून पाझरे तव प्रीती,
  सदैव शरणागत भक्तांवर...५


तुझे रुप मनी वसो सदा,
नाम राहो मुखी सर्वदा,
तुझी भेट घडतच राहो,
मारताचि प्रेमळ एक सादा... ६


प्र-निलयम् तर्फे देवशयनी आषाढी एकादशीच्या मनःपुर्वक शुभेच्छा..

प्रणिल टाकळे