"ऑनलाईन गुरु"
गुरुपौर्णिमा....
गुरुपौर्णिमा म्हणजे भारतीय संस्कृतीमधला अतिशय महत्त्वाचा दिवस. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी जन्माला येण्या आधीपासून आपल्यावर गर्भसंस्कार करणारी आपली माता.. हीच सर्वप्रथम गुरु असते आणि तिचं ते प्रथम गुरु हे स्थान कोणीच घेऊचं शकत नाही. हिरावून तर नाहीच नाही.
गुरुपौर्णिमा म्हणजे भारतीय संस्कृतीमधला अतिशय महत्त्वाचा दिवस. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी जन्माला येण्या आधीपासून आपल्यावर गर्भसंस्कार करणारी आपली माता.. हीच सर्वप्रथम गुरु असते आणि तिचं ते प्रथम गुरु हे स्थान कोणीच घेऊचं शकत नाही. हिरावून तर नाहीच नाही.
नंतर पुढे जसजसे आपल्या आयुष्याला आकार मिळत जातो तसतसे आपल्या आयुष्यात गुरुंची प्रतिमा तयार होत जाते. शाळेत असताना मला अमुकअमुक सर खूप आवडायचे. त्यांची विशिष्ट शैली आपल्या मनात घर करुन कायमची स्थिरावते.
प्रत्येकजण परमेश्वराला मानतोच असं नाही. इथे तर साक्षात त्या परमेश्वराला आणि त्याच्या पुत्रालाही हे मान्यचं असते. कारण प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य हे परमेश्वर आणि परमात्म्यालाही पुर्णपणे माहित असते. पण त्याच परमात्मस्वरुपात आपल्याला आपला गुरु शोधता आला तर?
श्रीसाईसच्चरितामध्ये ओवी येते,
"काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा ॥"
ह्या ओळींमध्ये बरचं काही येऊन जातं. गुरुची गरज, आधार अगदी प्रत्येकाला संपुर्ण आयुष्यभर लागतेच लागते. कारण त्यात एक विश्वास दडलेला असतो की आपल्या चांगल्यासाठी आपल्याला योग्य मार्ग दाखविणारा हा एकच... "गुरु".
फार पूर्वीची गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य ह्यांची कथा आपण ऐकतो. त्यात एकलव्याची एकनिष्ठता आणि चिकाटी( persiveness) त्याला हवे असलेल्या गुरुंकडून जरी शिक्षण घेता आले तरी त्यांना गुरु मानून त्याने विद्या संपादन केलीच. आणि गुरु दक्षिणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठाही दिला.
आजच्या जगात एकलव्य सारखा शिष्य होणे कदापि शक्य नाही. पण नविन युगानुसार विज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत गेलं. मोठमोठया महाविद्यालयात ऑनलाईन(Online) लेक्चर्स होऊ लागले आहे. Internet मुळे सगळं काही सोपं झालं आहे. असाचं एक माझा "ऑनलाईन गुरु". त्याची ओळख तुम्हालाही करुन देतो.
"Youtube"...
यु-टयुब ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या मदतीने आपण हवी ती गोष्ट शिकू शकतो. मी माझ्या छंदांच्या यादीमध्ये " संस्कार भारती रांगोळी" चा उल्लेख केला आहे. त्या रांगोळी कलेचे मी शास्त्रशुद्ध शिक्षण जरी नसले घेतले तरी ह्या माझ्या "ऑनलाईन गुरु" मुळे मला ती कला शिकता आली. अगदी प्राथमिक धडयांपासून ते मोठया रांगोळया कशा काढल्या जातात, हे सर्वकाही ह्याच Youtubeच्या मदतीने शिकता आले.
आता तुम्ही म्हणाल की कसं काय हे वापरता येईल..
१. आपल्या मोबाईलमध्ये Youtube हे इनबिल्ड(Inbuild) असतं. त्यासाठी आपल्याला Play store मधून डाऊनलोड करण्याची गरज नसते.
२. ह्या अँपवर क्लिक केल्यावर आपल्याला सर्वात वरती Search option दिसेल. त्यात आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याबद्दल टाईप करावे आणि Search करावे.
उदा. तुम्हाला एखादे ग्रीटींग बनवायचे असले तर search option मध्ये Handmade Greetings किंवा How to make greetings किंवा नुसतं Greetings असं जरी टाईप केलतं तरी त्यासंबंधीच्या सर्व व्हिडीओजची यादी आपल्याला मिळेल.
३. त्यातली आपल्याला हवी असलेली व्हिडीओ आपण ओपन करुन पाहू शकतो. आणि जर ती व्हिडीओ आपल्याला हवी असेल तर आपण ती डाऊनलोड पण करु शकतो. मात्र त्यासाठी आपलं अकाऊंट असणं गरजेचे आहे.
४. ह्या अकाऊंटसाठी आपले Mail id चे अकाऊंट इथे आपण वापरू शकतो. त्यासाठी नवीन अकाऊंट बनवण्याची गरज नसते.
५. ह्या Youtube मध्ये आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
* Music
* Movie
* advertise
* News
* Games
* live
* Music
* Movie
* advertise
* News
* Games
* live
ह्यातला पर्याय वापरुन Search केल्यावर आपल्याला निवडलेल्या पर्यायासंबंधीच व्हिडीओजची यादी मिळू शकते.
बदलत्या जगाबरोबर अप- टू- डेट राहण्यासाठी Youtubeची मदत मोलाची ठरते, ह्यात शंका नाही.
हे वापरण्यासही सोपे आहे. आणि आपल्याला जी कोणती गोष्ट हवी असेल आणि ती Youtube वर नसेल, असे होणारचं नाही. काही कलात्मक गोष्टी किंवा डेली रुटीच्या गोष्टींसाठी आपल्याला Classes ची फी न भरताचं बरचं काही शिकता येऊ शकतं.
अगदी मुलांना टाय कसा बांधावा यापासून ते लहान मुलांना वही-पुस्तकांना कव्हर कसे घालायचे, हे शिकवणारा..
तर मुलांना नवनवीन हेयर स्टाईल पासून ते ऑफिसच्या घाईत झटपट पण पौष्टिक रेसीपी करायला शिकवणारा...
मोठया मंडळींच्या कधी चुकलेल्या ठळक बातम्या पुन्हा दाखवणारा..
तर गृहिणीचा चुकलेला टिंव्ही शो Without ब्रेक दाखवणारा...
आजी- आजोबांना लांबच्या तीर्थस्थानांचं ही थेट(live) दर्शन घडवणारा...
असा हा सगळ्यांचा "ऑनलाईन गुरू" ...Youtube.
ह्या माझ्या "ऑनलाईन गुरु"ला आणि त्याच्या वापरासाठी प्रेरणा
देणा-या माझ्या लाडक्या "सदगुरु"ला "गुरुपौर्णिमेच्या" कृतज्ञतापुर्वक खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार.
प्रणिल टाकळे
Pranil very informative article. This is really interesting that omecan learn on his own.
ReplyDeleteThanks.
हरीओम
ReplyDeleteसद्गुरू हेच माझे कर्म
सदगुरू हेच माझे मर्म
सदगुरू हेच माझे मायबाप
सदगुरू हाच माझा आधार
सदगुरू हेच माझे धेय
सदगुरू हाच माझा मित्र
सदगुरू हेच माझे जिवन
सदगुरू हेच माझे अंनतत्व.....
ह्याच माझ्या सदगुरू अनिरूद्ध बापूँना माझे कोटी कोटी नमस्कार🙏
सदगुरू अनिरूद्धसिंह कि जय🙏🙏🙏
AMBADNYA
you tube guru.. very true.. nice writeup..
ReplyDelete