सेल्फ़ी- नैतिकतेची जपणूक महत्त्वाची...
आजकाल प्रत्येकालाच आपले स्व:ताचे छान असे फ़ोटो असावेत किंवा त्यांचा नीट संग्रह करुन ठेवावा असं वाटतं. पण आधी रोल भरुन आपल्याला आपला कँमेरा सगळीकडे घेऊन जावा लागत असे. मग जेव्हा तो पूर्ण रोल संपत नाही तो पर्यंत आपण त्यातले फ़ोटोज पाहू शकत नसू. मग तो रोल आपण दुकानात जाऊन ते फ़ोटो आणत असू आणि ह्या सर्व गॊष्टीला कमीतकमी एक आठवडा लागत असे.
पण हळूहळू विज्ञानाने प्रगती केली आणि आपल्याकडे डिजीटल कँमेरा आले. ज्यात आपण हवे ते फ़ोटो निवडू शकतो आणि कधी फ़ोटो नीट नाही आले असतील तर मग आपण परत ते फ़ोटो काढू शकतॊ. पण नंतर आपल्या मोबाईलमध्येही कँमेरा येवू लागले. आणि ह्ळूह्ळू त्या कँमेरामध्येही तंत्रज्ञान प्रगत होऊन डिजीटल कँमेरासारखेच पर्याय मोबईलमध्ये उपलब्ध होऊ लागले. मग मोबाईलमुळे वेगळ्या कँमेराची आपल्याल गरज कमी भासू लागली. मोबाईलमध्ये फ़ोटोंचा संग्रह करणे, आपल्याला सोयीचे झाले.
ह्या नंतरही विज्ञान प्रगती करण्याचे थांबले नाही तर मोबाईलमध्ये एक सोडून दोन कँमेरांची सोय होऊ लागली. ती सोय म्हणजे "फ़्रन्ट कँमेरा". ह्या कँमेराचा वापर करुन आपण आपले स्व:ताचे फ़ोटो अगदी सहजपणे काढू शकतो, ह्याच पद्धतीला "सेल्फ़ी" काढणे म्हणतात. सेल्फ़ी हा असा प्रकार आहे ज्यात आपल्याला आपला किंवा आपल्या ग्रुपचा एकत्रितपणे फ़ोटो काढण्यासाठी कोणा इतर व्यक्तीची गरज भासत नाही. आपण एकाचवेळी एका फ़ोटोमध्ये अनेक जणांना सामावून घेऊ शकतॊ. ह्या प्रकारामुळे वेगळी आणि अनेक आठवणींची साक्ष म्हणून आपण ह्या सेल्फ़ी फ़ोटोंचा संग्रह करतो.
आपल्याला ह्या नविन तंत्रज्ञानाकडे विज्ञानाचा आपल्यासाठी वरदान म्हणून पाहता आले पाहिजे आणि त्याचा तसाच मर्यादेमध्ये वापर केला तर नक्कीच आपल्यासाठी फ़ायदा आहे. पण आपणचं जर आपल्याला लाभलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा उचित वापर केला नाही तर हे नविन तंत्रज्ञान आपल्याला वरदानाऎवजी शाप ठरते.
आजकालच्या तरुणपढीला ह्या सेल्फ़ीचे एक प्रकारचे व्यसन लागलेले आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रसंग कोणताही असला तरी तरुणांसाठी त्य प्रसंगाची पुर्तता "सेल्फ़ी"शिवाय होतच नाही. मग ते ठिकाण काँलेज असलं की विचारयलाच नको. अगदी रोजच्या रोज फ़ोटो काढलेच जातात. लग्नसराईत सेल्फ़ी काढणे, हादेखील एका विधीचा भाग आहे, असंही आपण आता म्हटलं तरी त्यात काही नवल नाही वाटणार. आजूबाजूची जागा, परिस्थिती आणि मुख्य म्हणजे सेल्फ़ी काढताना स्व:ताची काळजी ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्याच पाहिजेत. कारण सेल्फ़ी काढण्याच्या नादात आपण आपले भान न विसरणे तितकेच महत्त्वाचे असते.
मध्यंतरी व्हाँसअँप तसेच फ़ेसबूकवर काही सेल्फ़ी काढण्यावरुनच्या चित्तथरारक व्हिडीऒ पाहयला मिळाल्या. अशा व्हिडीऒमध्ये सुदैवाने जरी जीव वाचला, हे चांगलं जरी असलं तरी ह्या गोष्टी करताना नैतिकता आपण का हरवून बसतॊ. समुद्राच्या कडेला उभे राहून, रेल्वे प्लँटफ़ाँर्मच्या टॊकावर उभे राहून किंवा बिल्डींगच्या टेरेसवर उभे राहून फ़ोटो काढून ते सोशल नेटवर्किंग साईटवर शंभर लाईक्स मिळावायला अपलोड करतात. त्यांना असं वाटतं असतं की आपण असा फ़ोटो काढून बरचं काही मिळवलं आहे. पण त्यात जराशीही काही चूक झाली तर अगदी क्षणार्धात आपण सगळं गमावून बसू शकतो.
परमेश्वराने आपल्याला दिलेले आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगताना आनंदाने जगावं मात्र आपल्याच उतावीळपणामुळे त्या आनंदी जीवनावर कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही, ह्याची खात्री ज्याने त्याने घेणे अनिवार्य आहे.
"सेल्फ़ी काढताना असावे भान,
सभोवतले निरीक्षण करावे छान,
विसरून न जाता ही मर्यादा,
ठेवू नव्या तंत्रज्ञानाचा मान.."
प्रणिल टाकळे
Very apt post. I too am an avid selfieer and it's great fun but yes as you have highlighted we need to follow some Maryada. Recently someone sent me a selfie which a guy had taken with his uncle's dead body. This certainly was taking things beyond the limits.
ReplyDeletenice....
ReplyDelete