खजाना सरकारी नोकरीचा.....
प्रत्येकाचे हेच स्वप्न असते की प्रत्येकाला Secure नोकरी मिळावी, पण ती पहिल्याच वेळात मिळेलचं ह्याची शाश्वती नसते. सध्याच्या जगात शर्यती फक्त खेळांतच उरलेल्या नसून अगदी नोक-यांच्याही क्षेत्रात देखील तेवढीच चढा-ओढ सुरु आहे. "Recession" हा शब्द बरेचदा कानावर पडतो. Recession म्हणजे एका ठराविक कालावधीनंतर कोणतीही पुर्वसुचना न देता व्यक्तीला कामावरुन कमी करतात. आणि बहुतांशी हे प्रमाण IT क्षेत्रात अनेकदा पहायला मिळते. कारण Industries पेक्षा employees ची संख्या वाढत आहेत. बरेचसे काम आता संगणकीय होत असल्याने मनुष्यबळ (manpower) कमी लागते. त्यामुळे ५ जणांचे काम २ जण अगदी आरामात करु शकतात. उरलेल्या ३ जणांना नोकरीची पुरती शाश्वती नसते.
मग कुठे तरी मनाच्या एका कोप-यात सरकारी नोकरीविषयी भावना डोकं वर काढू लागते. त्या सरकारी नोकरीमध्ये प्रवेशपुर्व परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षेचा अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा व स्पर्धात्मक असतो. त्यासाठी प्रत्येकाला कोचिंग क्लासेस लावण्याची क्षमता असतेच असे नाही. तसेच काही ऑफिसच्या मंडळींना side by side करण्यासाठी वेळ नसतो.
मग अशावेळी जर हा अभ्यास, परीक्षेची पुर्वतयारी Online करता आली तर????
अहो... खरचं...
"प्रत्यक्ष मित्र" मुळे हे अगदी सोपं झालं आहे.
ह्या साईट वरच्या " इन्फरमेशन टेक्नॉलोजी" ह्या सदरामध्ये "सरकारी नोकरी का खजाना" ह्यात अतिशय महत्त्वपुर्ण माहिती सांगितली आहे.
ह्या साईट वरच्या " इन्फरमेशन टेक्नॉलोजी" ह्या सदरामध्ये "सरकारी नोकरी का खजाना" ह्यात अतिशय महत्त्वपुर्ण माहिती सांगितली आहे.
ह्या दोन वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
उदा...
UPSC- Union Public Services
CDS- combined Defence Services
CES- Civil Examination Services
UPSC- Union Public Services
CDS- combined Defence Services
CES- Civil Examination Services
ह्या आणि इतर अनेक बँकाच्या परीक्षेसाठीही ह्या साईटचा खूप उपयोग होऊ शकतो.
ह्या साईटची काही ठळक वैशिष्ट्ये:-
१. मागच्या वर्षीच्या झालेल्या प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.
२. प्रत्येक परीक्षेसाठीचे लागणारे Application Forms मिळू शकतात.
३. प्रत्येक परीक्षेनुरुप विषयांचा सखोल अभ्यासक्रम.
४. प्रत्येक परीक्षेचा निकाल ह्या साईटवर जाहिर होतो.
५. परीक्षेमध्ये विचारल्या जाणा-या "सामान्य ज्ञान" विषयीची माहिती, त्यावरील विविध विषयाचा संदर्भ, राजकारण, खेळ ह्यांची माहिती उपलब्ध आहे.
६. महाग पुस्तकांचा खर्च वाचवण्यासाठी सोप्या अशा विषयानुरुप नोटस् मिळतात.
७. प्रश्नमंजुषा मिळते.
साहजिकचं आहे की हे सर्व करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी स्वतःचा वेळ नक्कीच द्यावा लागेल. प्रत्येक विकल्प
(अडचण) सोडवण्यासाठी ३ मार्ग(संधी) मोकळे होतच असतात. पण त्यासाठी योग्य वेळ, मेहनत, चिकाटी( Persiveness) ह्या त्रिसूत्रीची जोड मिळाली तर यश नक्कीच आपलं आहे आणि सदैव आपलचं असतं.
संदर्भ:-
"प्रत्यक्ष मित्र" :- http://www.pratyaksha-mitra.com/
प्रणीलजी आपण खरोखर महत्त्वपुर्ण माहीती दिलेली आहे. सामान्य लोकांना सहज मीळु न शकणारी तसेच सर्वोपयोगी अश्या वेबसाईटची अोळख आपण करुन दिली त्याबद्दल मन:पुर्वक आभार.
ReplyDelete