पुस्तकांची ऑनलाईन दुनिया....

         मित्र...

             मित्र ह्या शब्दाचा किंवा नात्याचा खरा अर्थ काय?
जो संकटकाळी मदत करतो, योग्य मार्गदर्शन करतो तो. असा मित्र असावा किंवा मैत्रीण असावी, असं प्रत्येकाला वाटणं अगदी साहजिकचं आहे. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांत करण्यासाठी आणि कधी विरंगुळा म्हणून हवे असणारे मित्र, ज्यांच्या त्यांच्या वेऴेनुसार भेटणारे मित्र खरचं खूप कमी असतात. 

              पण त्यालाही अपवाद असू शकतो.  "पुस्तके". पुस्तक हा मित्र असणे फार पुर्वीपासूनचा सगळ्यांचा "Mutual friend" आहे. मग ती पुस्तकं कोणत्याही प्रकारची असोत. नाट्यमय पुस्तकं किंवा काव्य पुस्तक, कथानक असोत किंवा कादंबरी, सामान्य ज्ञानविषयक असोत किंवा सामाजिक विचारविषयक असोत, चरितात्मक पुस्तकं असोत किंवा पौराणिक असोत. प्रत्येक पुस्तकं हे आपले मित्र नक्कीच होऊ शकतात.
पण सध्याच्या धावपळीच्या दिवसांत मोठमोठी पुस्तकं ऑफिस, कॉलेजला घेऊन जाणे शक्य नसते, मग अशा वेळेला जर आपल्याला आवडणा-या विषयांची पुस्तकं जर आपल्याला मोबाईलवर वाचायला मिळाली तर? आणि ती ही अगदी विनामुल्य.

                     होय.. हे खरं आहे. 

         
"प्रत्यक्ष मित्र" ह्या साईटवर ह्याविषयीची मुबलक माहिती आपल्याला मिळते.

        EBook म्हणजे आपल्याला जी पुस्तके इंटरनेटद्वारे आपल्या मोबाईल किंवा संगणकावर वाचण्यास उपलब्ध होतात. ह्यात जास्त वजन असलेली पुस्तके स्वतःबरोबर नेण्यापेक्षा त्याची सॉफ्टकॉपी(Soft copy) मोबाईल किंवा संगणकात डाऊनलोड करुन जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्या सोयीनुसार वाचू शकतो.

             इथे काही वेबसाईट देत आहे, त्यांचा वापर आपण आपल्याला आवडणा-या विषयाचे पुस्तक निवडण्यासाठी करु शकतो.

१) http://www.booksshouldbefree.com/
ह्या लिंकचा वापर करुन आपण ऑडीओ पुस्तकं म्हणजेच ध्वनीमुद्रित पुस्तके ऎकण्यासाठी करु शकतो. ज्यांना लिहीता, वाचना किंवा पाहता येत नसेल, त्यांना ह्या पुस्तकांचा खूप फायदा होऊ शकतो.

२) http://manybooks.net/
ह्यावरुन आपण फॅशन जगताविषयक गोष्टीची पुस्तके, नाटक तसेच व्यापाराविषयक पुस्तके वाचू शकतो.

३) http://ebooks.netbhet.com/
ह्या लिंकवरून आपण मराठी कादंबरी, नाटकं ह्याची पुस्तके वाचू शकतो.
अजूनही बरीच प्रकारची, विषयाची पुस्तके आपण डाऊनलोड करु शकतो, त्या अधिक माहितीसाठी नक्की भेट द्या, "प्रत्यक्ष मित्र"ला.

संदर्भ-

पुराने मित्र, नया स्वरूप:- 

प्रणिल टाकळे