श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती...स्त्रियांसाठी...
स्त्री...
स्त्री ही एक अशी भूमिका आहे, जी इतर कोणालाही निभावता येणे शक्य नाही. आणि मुख्य म्हणजे स्त्रीलाच एका आयुष्यात अनेक नाती निभावता आणि अनुभवता येतात. पहिलं नातं म्हणजे, जन्मदात्यांची मुलगी. मुलगी ही जणु प्रत्येकाच्या घराची ताईत असते. मुलगी कोणाची ताई तर कधी कोणाची लहान बहिण बनते. नंतर वयात आल्यावर लग्न करुन कोणाची तरी पत्नी, सून, वहिनी, मामी, काकू अशा अनेक नात्यांनी नटते. फक्त लग्न झाल्या झाल्या एका नात्यातून तिला अनेक नात्यांची नव्याने जोड मिळते. कालांतराने आई होते. नोकरी करणारी असल्यास वर्किंग वुमन तर कधी संपुर्ण घर स्वबळावर सांभाळणारी हाऊस वुमन असते.
एकाच वेळेला एका स्त्रीला अनेक पातळ्या, नाती सांभाळाव्या लागतात. घर, नवरा, मुलं, सासू-सासरे(एकत्रित कुटुंब असल्यास), ऑफिस, स्वतःची आवड आणिसर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःला जपायचे असते. आणि ही सर्व होणारी कसरत एक स्त्री नक्कीच एन्जॉय करत असते. सर्व कामं सांभाळून ही तारेवरची कसरत कशी लिलया करण्याची Trick तिच्याकडे असतेच असते.
ही सर्व कामं करताना तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तसेच स्वतःला वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो का? तिची इच्छा असूनही तीला कशाची अडचण येतेय का? आणि आलेल्या अडचणींपासून घराला सावरण्यासाठी, किंवा घराला काही कमी पडू न देण्याच्या तिच्या धडपडीला कोणाची साथ मिळते का?
आताच्या युगात तीला स्वतःची आणि त्याच बरोबर कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी सक्षम होण्याची गरज आहेच. त्यासाठी आधी घरची स्त्री सक्षम असणे आवश्यक आहे.
आपण स्त्री हे एक आदिमाता चण्डिकाचा अंश मानतो. ज्याप्रमाणे तिच आदीमाता जेव्हा असूराचा नाश करण्यासाठी महाकाली रुप घेते, तर त्याच क्षणाला पृथ्वीवर अवकर्षण कमी करण्यासाठी वत्सल अन्नदा शताक्षी बनते. हे दैवी मातेचे आपल्या पृथ्वीपुत्रांसाठीचे प्रयास आहेत. मानवी माता ही आपल्या पुत्रासाठी तेवढीच सक्षमतेने लढते, हे आपल्याला राणी लक्ष्मीबाईंच्या कथेवर कळते. एका मातेला आपल्या पुत्रापर्यंत पोहोचण्यासाठी कसल्याच मर्यादा नसतात, हे हिरकणीच्या गडाच्या कडावरुन चंद्राच्या उजेडात रात्री खाली येण्याच्या जिद्दीवरुन समजून येते.
प्रत्येक स्त्री ही कुटुंब वत्सल माता असतानाही कुटुंब रक्षण रणरागिनीही असते, हे विसरून चालणार नाही. तिच्या ह्या स्वरुपाला त्याच आदिमातेकडून अधिक बळ मिळण्यासाठी आणि आदिमातेच्या पुत्राकडून भक्कम पाठिंबा मिळण्यासाठी सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी रामराज्य २०२५ वरचे प्रवचन करताना अतिशय सुंदर प्रपत्ती सांगितली आहे. ह्या प्रपत्तीला "श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती" म्हणतात.
ही प्रपत्ती करणे म्हणजे, आदिमाता आणि तिचा पुत्र परमात्मा(महाविष्णु, साई, स्वामी) ह्यांचावरचा एकत्रित आणि संपुर्णपणे विश्वास ठेवून आपला प्रपंच(कुटुंब,संसार, ऑफिस) आणि अध्यात्म (परमेश्वरावरची सेवा, भक्ती) सुखाचा करणे.
श्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे पाच अंग आहेत, ज्यावरुन आपल्याला ह्याचे उचित आणि सार्थ असे महत्त्व लक्षात येईल.
१) श्रीमहिषासूरमर्दिनी
२) स्वतः चण्डिका आणि तिच्या पुत्राकरवी माझे रक्षण करीलचं, हा दृढ विश्वास बाळगणे व वारंवार व्यक्त करणे.
३) परमात्म्याचे सदैव आश्रयत्व स्वीकारणे.
४) चण्डिकेने मला जवळ घेऊन परमात्म्याच्या हाती सोपवणे.
५) चण्डिकेच्या कृपेनेच भक्ती संपादन करुन प्रपंच व अध्यात्म करण्यासाठी चण्डिकेला शरण जाणे.
ही पाच सर्वोत्कृष्ट अंग मनाशी घट्ट बांधून घेऊन ह्या प्रपत्तीचा आनंद उपभोगायचा आहे.
ही प्रपत्ती १४ किंवा १५ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर स्त्रियांनी एकत्र येऊन मोकळ्या जागेत करायची असते. मग ह्या प्रपत्तीसाठी मकरसंक्रांत हाच दिवस का निवडला?
फार वर्षांपुर्वी महिषासूर नावाचा असूराने पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार उडवून सोडला होता. त्याच्या ह्या उच्छादामुळे सर्व पृथ्वीवासी त्रस्त झाले होते. आणि त्या मुळ अशुभाला फक्त एक स्त्रीकडूनच मृत्यू येवू शकतो, हे लक्षात घेऊन साक्षात आदिमातेनेच आपल्या कुटुंब(पृथ्वी) रक्षणासाठी अवतार घेण्याचे ठरवले. त्यासाठी आदिमातेला पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ जागा हवी होती कारण ती जेव्हा अंतरिक्षातून पृथ्वीवर पाऊल ठेवण्या आधीच पृथ्वी थरथरू लागली. तेव्हा तिने ऋषी कर्दम आणि देवहूती ह्याच्या कतराज आश्रमात पहिले पाऊल ठेवले.
महिषासूरासारख्या अशुभाचे जनकत्व असलेल्याचा नाश करण्यासाठी आदिमातेने सक्षमतेचे पाऊल कसे आणि कधी उचलायचे, ह्याचे उदाहरण फार पुर्वीच सर्व स्त्रियांना दिलेच होते. त्यावरून तिला आपल्या प्रत्येक कन्येला सक्षम, कणखर बनवायचेच आहे आणि तेही तिच्या पुत्राच्या म्हणजेच परमात्म्याचा आधार सर्व पुत्रींना देऊन.
ही प्रपत्ती मोकळ्या जागीच करु शकतो.
उदा. मैदानात, समुद्र किनारी इ.
उदा. मैदानात, समुद्र किनारी इ.
ह्या प्रपत्तीची मांडणी अगदी साधी आणि सुटसुटीतच आहे.
१) एका चौरंगावर किंवा पाटावर मोठी परात घ्यावी.
२) परातीत गहू, त्यावर कळशी किंवा कलश, त्याच्यामध्ये तांदूळ घालावेत.
३) या कळशीवर ताम्हन ठेऊन त्यात देवीची दोन पाऊले. उजवं पाऊल कुंकवाच, डाव पाऊल हळदीच अशी काढावी.
४) त्या परातीमध्ये कलशाला टेकून त्रिविक्रमाचा फोटो ठेवायचा.
* प्रपत्ती पूजा साहित्य-
· एक तबक.
· त्यात
1. शेवग्याच्या शेंगा,
2. केळी,
3. काकडी किंवा दुधी
4. नारळ,
5. गाजर,
6. मुळा किंवा तोंडली,
7. उडदाची डाळ,
8. तिळाचे तेल,
9. दही,
10. हळद,
11. आले,
12. गूळ,
13. चिंच,
14. ऊसाचे कांडे,
15. अभिचारनाशक पुरचुंडी
(विड्याचे पान,त्यामध्ये मीठ, मोहरी आणि कापूर हे घालून त्या पानाला दोरीने बांधायचे, ज्याने आपण ज्याला आपला बाप, बंधू, सखा मानतो, अशा आपल्या परमात्म्याची दृष्ट काढतो)
16. सुगंधित फूले.
* प्रपत्ती करण्याची पद्धत-
१) सर्व स्त्रियांनी पुजन साहित्य घेऊन पुजन मांडणी समोर उभे रहावे आणि सर्वांमध्ये ज्येष्ठ असलेल्या स्त्रीला चण्डिकेची आरती करायला द्यावी. त्यावेळी सर्वानी “मातेगायत्री सिंहारूढ भगवती.....” ही मोठ्या आईची आरती करावी.
२) त्यानंतर तबक हातात घेऊन सर्व स्त्रियांनी माता चंडिकेच्या पदचिन्हस्थानास अर्थात कतराज आश्रमास फेर धरल्याप्रमाणे नऊ प्रदक्षिणा घालायच्या व ह्या प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुक्षेत्रम् मंत्र मोठ्याने म्हणायचा.
३) त्यानंतर अभिचारनाशक पुरचुंडी घेऊन श्रीत्रिविक्रमाची प्रेमाने दृष्ट काढावी आणि त्याला सांगायचे, बाबारे माझ्या घरावर असणारी कुठलीही कुदृष्टी, कुबुद्धी ह्या सगळ्यांचा तू तुझ्या आईच्या सहाय्याने नाश कर.
४) मग ती पुरचुंडी खड्डयात किंवा एका बाजूला कापूर व काठ्यांच्या साहाय्याने तयार केलेल्या अग्नीत सोडावी. हा निर्माण केलेला अग्नी म्हणजेच आदिमाता महिषासूरमर्दिनीचे तेजोवलयम्. ह्यात आपण त्रिविक्रमाकडे आपल्या घराची सर्व जबाबदारी देतो.
५) इथे श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रामुळे त्या अग्नीचे रुपांतरण तेजोवलयम् मध्ये झालेले असेल.तुमच्या घरावर असलेली कुदृष्टी, कुबुद्धी, कुकर्म ह्या तेजोवलयम् मध्ये गेल्यामुळे तुमच्या घराचे कल्याण होईल अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धानी आपल्याला दिली आहे.
५) इथे श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रामुळे त्या अग्नीचे रुपांतरण तेजोवलयम् मध्ये झालेले असेल.तुमच्या घरावर असलेली कुदृष्टी, कुबुद्धी, कुकर्म ह्या तेजोवलयम् मध्ये गेल्यामुळे तुमच्या घराचे कल्याण होईल अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धानी आपल्याला दिली आहे.
६) पूजा समाप्त झाल्यावर “ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे हा मंत्र ९ वेळा म्हणत सर्व स्त्रियांनी आदिमातेच्या पावलांवर अक्षता वहाव्यात व त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करावीत व तेजोवलयमच्या अग्नीस कडूलिंबाच्या पाल्याने शांत करावे.
७) जमलेल्या सर्व स्त्रियांनी त्या पावलातील हळद कुंकू घरी न नेता स्वतःच्या कपाळास लावावे.
८)तबकातील केळी आदिमातेला अर्पण करावी व त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करावे
९) दही घरी नेऊन घरातील पुरुषांना प्रसाद म्हणून द्यावा. स्त्रियांनी दही खाऊ नये. जर काही कारणास्तव घरात पुरुषमंडळी नसतील तर ते दही कुठल्याही वृक्षाच्या मुळाशी अर्पण करावे.
१०) उस घरी नेऊन स्वतः खावा व घरातील इतर स्त्रियांनाही द्यावा. तो त्या दिवशी थोडा तरी खावा, व नंतर उरलेला खाल्ला तरी चालेल.
११) उरलेल्या प्रपत्ती पूजाद्रव्याचे सांबार बनवून ते त्याच रात्री घरातील स्त्रिया व पुरुषांनी पोळी आणि भाताबरोबर खावे. सांबार तयार करण्यासाठी त्यात मसाल्याचा वापर करण्यास हरकत नाही. तसेच चवीसाठी व आरोग्यासाठी त्यात कडीपत्ता जरूर घालावा. मात्र ह्या दिवशी इतर कुठलीही भाजी करू नये.
* प्रपत्ती करण्याचे फायदे-
हे व्रत करणाऱ्या स्त्रिया आदिमाता चण्डिकेच्या सैनिक बनतात, स्वतःच्या गृहरक्षणासाठी,स्वतःच्या आप्तांच्या रक्षणासाठी. कोणत्याही प्रकारचे रक्षण करण्याचे काम आज स्त्री करू शकेल. ती अबला राहणार नाही, दुर्बल राहणार नाही. ती स्वतःच्या घराच्या रक्षण करण्यासाठी स्वतः समर्थ बनेल.
यावर्षापासून प्रपत्तीच्या मांडणी भोवती फेर धरून सर्व मर्यादा आणि पावित्र्य सांभाळून गरबा करण्याचीही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ह्या अद्वितीय प्रपत्तीच्या आनंदात आणि स्वतःच्या आयुष्याला सक्षम बनवण्यासाठी मकरसंक्रांतीला श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती करण्याची सुवर्णसंधीचा जरुर लाभ घ्या.
प्रणिल टाकळे
Reference:-
2) Aniruddha Kaladalan :-
प्रणील आपण प्रपतीची खरोखर अत्यंत महत्वाची व सुंदर माहीची मांडली आहे. खुप खुप अंबज्ञ व मनपुर्वक आभार.....
ReplyDeleteश्री राम अम्बज्ञ । खुप छान प्रणिलसिंह ।
ReplyDelete"श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती" आदिमाता महिषासुरमर्दिनीची असीम कृपा स्विकारण्याचे , तिच्या आनंदवर्षावात न्हाऊन निघायचे अमोघ वरदान आणी अद्वितीय सुवर्ण संधी. खूप सविस्तर माहिती दिल्याबद्द्द्ल प्रणील टाकळे आपल्याला धन्यवाद !
ReplyDeleteश्रीमंगलचण्डिकाप्रपत्तीचे पाच अंग खूप महत्त्वाची आहेत हे आपल्या लेखातून समजले . हे पूजन प्रत्येक स्त्रीसाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणवले.
सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशींनी एका खूपच सुंदर आदिमातेच्या कृपाप्राप्तीचा मार्ग आम्हा स्त्रियांना दाविला आहे.
धन्यवाद.... उमेश... डॉ. निशिकांत विभुते आणि सुनिताजी.
ReplyDeleteतुमच्या माझ्या ब्लॉगला दिल्या जाणा-या प्रोत्साहनामुळे नवनवीन लेख लिहिण्याचे प्रयास जोमाने सुरु आहेत.