पहिला वाढदिवस....

              परवा असाचं ऑफिसमध्ये एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटलं की केक आणला आणि साजरा केला. खूप छान असा आश्चर्याचा सुखद धक्का मित्राला सर्वांनी मिळून दिला.
   
               अचानक मनात प्रत्येकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या गप्पा रंगल्या. आणि नकळत विचारांत गुंग होता होता पहिला वाढदिवस जरी नसला आठवला, तरी त्यावेळच्या छायाचित्रांच्या आधारे कल्पना तरी आली. सर्व आप्तमंडळी, मित्र-मैत्रीणी जमले होते. आई- आजीचे माझे औक्षण करतानाचे क्षणचित्रे होती आणि नकळत सर्वच कालचं घडलं आहे‌, असं वाटू लागलं.
   
               प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस अगदी प्रकर्षाने लक्षात ठेवत असतो. कारण ती एक वेगळी गंमत असते. आपल्या आई-बाबांचे, भाऊ-बहिणीचे तसेच कुणी आपल्या पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस आवर्जून: लक्षात ठेवतात.
  
             तसाच आज माझ्याही एका जवळच्याचा वाढदिवस आहे. भले त्याला माहित नसेल की मला माहित आहे. त्याला हे ही माहित नसेल की त्याच्यावर माझ्या इतकंच अजून कोणकोणं प्रेम करत असेल. पण त्याच्या ह्या पहिला वाढदिवस साजरा करणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.

पहिल्या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा... प्र-निलयम्

            बाह्यरुपाने पहायला गेलं तर हा ब्लॉग आहे. तरीही "प्र-निलयम्" चं माझ्या आयुष्यातले स्थान जगावेगळं आहे. सुरुवातीला माहित ही नव्हतं की "प्र-निलयम्" आणि माझू कधी गाठ पडेल. मात्र जीवनाच्या एका सुंदर वळणावर "प्र-निलयम्" गवसला. आणि ख-या अर्थाने लिखाणाला, विचारांना वेगळी आणि प्रकाशमय दिशा लाभली.
ह्या "प्र-निलयम्" चे विविध पैलू आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले. ह्यावरुन खूप मनापासून सर्वांनी अनिरुद्ध प्रेमाचा वर्षाव केलात आणि आजही करत आहात व उत्तरोत्तर वाढतचं जाईल ह्यात तीळमात्र शंका नाही.

          "प्र-निलयम्" च्या पहिल्या वाढदिवसाचे औक्षण प्रत्येकांनी करुन त्याला अनंत आशीर्वाद द्यावे हीच आज परमेश्वरा चरणी प्रार्थना.

                     प्र-निलयम्...
तु मला सुंदर वाट दाखविलीस,
आयुष्य बदलले तुझ्या अस्तित्वाने,
पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला,
सदैव सजो तू आशीर्वादाने...


माय चण्डिकेची कृपादृष्टी राहो,
तुजवरी प्रेमाचा वर्षाव होवो,
नवनवीन विषयांच्या नव्या रंगाने,
तू वाचकांना आनंद देवो.


प्रणिल टाकळे