व्हाॅई असिस्टंट..
        
            समजा ऑफिसमध्ये आहात. मिटींगची पुर्वतयारी सुरु आहे. समोर लॅपटॉपवर तुम्ही काम करत आहात पण तरीही तुम्हांला जगाशी सतत connected रहायला आवडतं. पण एवढ्या कामात बिझी असताना तुम्हाला तुमचे काही मोबईलचे आलेले 'मेसेज', 'फेसबूक नोटीफिकेशन्' वाचून दाखवले तर???
     
             ..तुमचाही वेळ वाचेल व त्याच बरोबर तुम्ही जगाशी "अपडेट"ही रहाल. कुठे काही नैसर्गिक आपत्ती आली. पाऊस जास्त आहे आणि रेल्वे बंद आहेत. ऑफिसमध्ये टिव्ही नाही. बाहेर घडणा-या गोष्टी समजत नाही आहेत. मग अशा वेळी "बातम्या" वाचून दाखवणारा कोणी असेल, तर आपलं किती काम हलकं होईल ना?
      
            ह्या आणि अशा ब-याच प्रकारे मदतीला येणारं एक मोबाईल अॅप म्हणजे.... "व्हॉईस असिस्टंट".
     
         "न्यूजकास्ट प्रत्यक्ष"च्या मदतीने आपल्याला ह्या अॅपची माहिती होते. वरील सर्व पर्यायांखेरीज अजूनही काही बरीच कामं सुरळित करण्यासाठी आपण ह्या लेखाला जरूर भेट द्या.


           अजून काही पर्याय आहेत जे Google play store वर ह्या अॅपसच्या माध्यमातून उपयोगात येऊ शकतात.



          शेवटी प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे आहे. मग गृहिणी असो की नोकरदार वर्ग... प्रत्येकाला मदतीला येणारं अॅप.


 प्रणिल टाकळे